28 February 2021

News Flash

आईच्या कडेवरुन निसटलं 10 महिन्यांचं बाळ, एअर होस्टेसने उडी मारून वाचवले बाळाचे प्राण

अचानक गुलाफा शेख यांच्या कडेवरील 10 महिन्यांचे बाळ निसटले. एअरहोस्टेस मिताली वैद्य या...

मुंबई विमातळावर एका एअरहोस्टेसने केलेल्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आईच्या कडेवरुन निसटलेल्या अवघ्या 10 महिन्यांच्या बाळाला या एअरहोस्टेसने उडी मारुन झेललं आणि त्याचा जीव वाचवला. बाळाच्या आईने एअरलाइन्सला एक पत्र लिहून एअरहोस्टेसचं तोंडभरुन कौतूक केलं आहे. मुंबई विमानतळावर मागच्या महिन्यात झालेली ही घटना सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. सोशल मीडियावर जेट एअरवेजच्या एअर होस्टेस मितांशी वैद्य यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गेल्या महिन्यात एक महिला मुंबई एअरपोर्टवरून अहमदाबादसाठी रवाना होत होती. चेक-इनची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ती सिक्युरिटी काउंटरजवळून जात होती, पण अचानक तिच्या कडेवरील 10 महिन्यांचे बाळ निसटले. सुदैवाने एअरहोस्टेस मिताली वैद्य या तेथेच होत्या आणि बाळ आईच्या हातातून निसटल्याचं त्यांनी पाहिलं. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी उडी मारुन बाळाला अलगद झेललं. यामध्ये बाळाला जराही दुखापत झाली नाही, परंतु मितांशीच्या नाकाला मात्र दुखापत झाली.

आपले बाळ सुरक्षित असल्याचे पाहून प्रायव्हेट कंपनीत एमडी पदावर असलेली बाळाची आई गुलाफा शेख यांनी जेट एअरवेज आणि एअर होस्टेस मितांशी यांचे आभार मानले. शेख यांना लग्नाच्या 14 वर्षानंतर मुल झालं आहे. जेट एअरलाइन्सला त्यांनी एक पत्र लिहिले, यामध्ये त्यांनी मितांशीला देवदूत आणि देवकन्याप्रमाणे म्हटलं आहे. ‘सुदैवाने एक तरुणी तेथे हजर होती, जिने माझ्या 10 महिन्यांच्या बाळाला वाचवले. यात तिच्या नाकाला दुखापत झाली, आणि ते व्रण आयुष्यभर राहू शकतात.’

जेट एअरवेजनेही मितांशीच्या कार्याची दखल घेतली आणि मितांशी आमच्या कंपनीसोबत आहे याचा अभिमान असल्याचं म्हटलं. चेह-यावरील निशाणामुळे नोकरी जाण्याची शक्यता असते पण मितांशीने चेह-यावर निशाण पडण्याचाही विचार केला नाही, पण त्या बाळाचे प्राण वाचवले अशा शब्दात कंपनीने मितांशीचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 10:08 am

Web Title: air hostess in mumbai quickly jumps catches baby who fell from his mothers arms
Next Stories
1 सडलेल्या फळाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना वाटलं वायूगळती झाली अन् …
2 प्रेरणादायी: ब्रेन टयूमरशी लढा देत तिने मिळवला ‘ब्यूटी क्वीन’चा किताब
3 Video: द्रविडच्या साधेपणावर प्रेक्षक फिदा, RCB चा प्रशिक्षक बनवण्याची मागणी
Just Now!
X