मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अश्वनी लोहानी यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी लोहानी यांची निवड करण्यात आली असून ते रोहित नंदन यांची जागा घेतील. पहिल्यांदाच रेल्वे सेवेतील अधिकाऱ्याची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोहानी हे १९८० साली भारतीय रेल्वे सेवेत यांत्रिक अधिक्षक अभियंता म्हणून रूजू झाले होते. लोहानी सध्या मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळात भोपाळ येथे कार्यरत आहेत.