24 September 2020

News Flash

केरळ विमान अपघात : राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे

मिग-२१चं केलंय उड्डाण

केरळमधील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघातात मृत्यू पावलेले विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. त्यांना ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ने गौरविण्यात आलं आहे. त्यांनी बराच काळ ‘गोल्डन अॅरोज-१७’ स्क्वॉड्रनमध्ये सेवा बजावली आहे. हे तेच स्क्वॉड्रन आहे ज्याच्याकडे नुकत्याच हवाई दलात सामिल झालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

कॅप्टन दीपक साठे हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ५८व्या तुकडीचे विद्यार्थी होते. त्यानंतर सन १९८१ मध्ये हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमधून ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ पटकावत उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. दरम्यान, त्यांनी मिग-२१ या लढाऊ विमानाचंही उड्डाण केलंय, अशी माहिती निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दिली. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. कॅप्टन साठे यांना बोईंग ७३७-८०० हे विमान चालवण्याचा अनुभव होता. नुकतेच त्यांनी एअरबस ए-३१० हे विमानही उडवले होते.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : १७ जणांचा मृत्यू; AAIB करणार तपास

राफेल विमानं ही अंबाला एअरबेसवरील ‘गोल्डन अ‍ॅरोज १७’ स्क्वॉड्रनचा भाग असणार आहेत. १९९९ साली झालेल्या कारगील युद्धामध्ये माजी हवाई दलप्रमुख धनोआ हे या स्वाड्रनचे नेतृत्व करीत होते. या स्क्वॉड्रनची स्थापना १९५१ साली करण्यात आली आहे. सर्वात आधी या स्क्वॉड्रन अंतर्गत दी हॅवलॅण्ड व्हॅम्पायर एफ एमके ५२ फायटरजेट विमानांनी उड्डाण केलं होतं. भटिंडा एअरबेसवरील कारभार हळूहळू बंद करण्यात आला. २०१६ साली रशियन बनावटीची मिग २१ विमानांचा वापर भारतीय हवाई दलाकडून कमी प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर येथील स्कवाड्रनचेही काम थांबवण्यात आलं.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : टेबलटॉप रनवे म्हणजे काय? का मानला जातो हा रनवे धोकादायक?

काय घडलं केरळमध्ये?

केरळ विमान दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२३ जण जखमी झाले आहेत. केरळच्या कोझिकोड इथल्या विमानतळावर शुक्रवारी (दि.७) रात्री ८ च्या सुमारास एअर इंडियाचं एक विमान लँड झालं. विमान धावपट्टीवर असतानाच हे विमान घसरलं आणि छोट्या दरीत पडलं. या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. १२३ जण किरकोळ जखमी तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडताच तातडीने त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका यांच्यासह मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 9:08 am

Web Title: air india captain who died in kerala crash had served in iaf newly resurrected rafale squadron aau 85
Next Stories
1 ऑगस्ट महिन्यात करोनानं मोडले सर्व विक्रम; जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात
2 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘त्या’ घरांच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…
3 संशोधनासाठी आलेले इस्रायलचे शास्त्रज्ञ मायदेशी; भारताला मिळणार चांगली बातमी?
Just Now!
X