सिगारेटची तस्करी करण्याच्या आरोपावरून लंडन पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांपैकी भाविक शहा या कर्मचाऱयाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर इतर कर्मचाऱयांना सोडण्यात आले. एअर इंडियाने पाच हजार पाऊंडचा दंड भरल्यानंतर पोलिसांनी शहाची सुटका केली.
लंडनमधील हिथ्रो विमानतळावर गेल्या शुक्रवारी ही घटना घडली. सिगारेटच्या ५० क्रेट्सची तस्करी केल्याच्या आरोपावरून लंडन पोलिसांनी एअर इंडियाच्या काही कर्मचाऱयांना ताब्यात घेतले होते. शहाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी इतर कर्मचाऱयांना सोडून दिले. त्यानंतर एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने हस्तक्षेप करून दंड भरल्यानंतर शहाची सुटका करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर शहाला तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याचे एअर इंडियाने सांगितले.