News Flash

वैमानिक करोना पॉझिटिव्ह, एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन बोलावले माघारी

मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवले होते

कर्जाच्या ओझ्याबरोबरच करोनामुळे एअर इंडिया आर्थिक संकटात. (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीहून मॉस्कोला निघालेले एअर इंडियाचे विमान उझबेकिस्तानवरुन माघारी बोलवण्यात आले. कारण विमानातील एक वैमानिक करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. शनिवारी सकाळी या विमानाने रशियाच्या मॉस्को शहरात जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरुन उड्डण केले होते.

उड्डाणाआधी टीमकडून क्रू मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. विमानाच्या कॅप्टनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण नजरचुकीने पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह समजून कॅप्टनला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. रशियाच्या मॉस्को शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवण्यात आले होते.

एअरबस ए ३२० विमानाने दुपारी १२.३० च्या सुमारास दिल्ली विमानतळावर लँडिंग केले. नियमानुसार सर्व क्रू मेंबर्स क्वारंटाइन होणार आहेत. या विमानाचे आता निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. एअर इंडियाकडून आजच दुसरे एअसबस ए ३२० विमान मॉस्कोला पाठवण्यात येईल.

“दररोज मोठया प्रमाणावर टेस्ट रिपोर्ट तपासावे लागतात. त्यामध्ये नजरचुकीने हे घडलं. दिल्लीत दररोज ३०० क्रू मेंबर्सची टेस्टिंग सुरु आहे. एक्सल शीटमध्ये हे सर्व रिझल्ट येतात. त्यामध्ये ही चूक घडली” असे सूत्रांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सुदैवाने त्यावेळी विमानामध्ये प्रवासी नव्हते. विमानाने उ़ड्डाण केल्यानंतर दोन तास झाले होते. क्रू मेंबर्सचे रिपोर्ट पुन्हा क्रॉसचेक करत असताना वैमानिक करोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. एअर इंडियाने या विषयावर पडदा घालण्याऐवजी सतर्कता दाखवत लगेच विमानाला माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विमान उझबेकिस्तानच्या आकाशात होते. वंदे भारत मिशनतंर्गत एअर इंडियाची विमाने वेगवेगळया देशांमध्ये पाठवण्यात येत आहेत. सरकारने उड्डाणाआधी विमानातील सर्व क्रू मेंबर्सची करोना तपासणी बंधनकारक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:48 pm

Web Title: air india delhi moscow flight called back after pilot found corona positive dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिल्ली करोनाच्या चार पावलं पुढे, अरविंद केजरीवालांचा दावा
2 …तर तैवानवर हल्ला करु, चीनने दिली युद्धाची धमकी
3 शिवराज सिंग चौहान यांनी उलगडला MODIआडनावाचा अर्थ
Just Now!
X