28 September 2020

News Flash

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं

दुबईहून कोझिकोड रनवेवर उतरलं होतं विमान

एअर इंडियाचं विमान (AIR INDIA Express Plane) केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर घसरलं. या घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर हे उतरलं. या विमानात १९१  प्रवासी होते. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. तर या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३ जण जखमी झाले आहेत.

IX-1344   Dubai-Kozhikode Air India express Plane होतं. हे धावपट्टीवरुन घसरताच एकच हलकल्लोळ उडाला. काय घडतंय हे कळण्याच्या आतच हा अपघात झाला. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. या पावसामुळे काही भागात भूस्खलनही झालं. त्याचंही वृत्त आजच आलं होतं. त्यापाठोपाठ विमान अपघाताची घटनाही समोर आली आहे.

विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. केरळमध्ये कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँड करत असतानाच ही घटना घडली. धावपट्टीवरुन हे विमान घसरलं आणि एका छोट्या दरीत पडलं. या घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचावकार्यही सुरु आहे.

कोण कोण होतं विमानात?
१७४ प्रवासी
१०-तान्ही बाळं
२- वैमानिक
५ केबिन क्रू

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन चर्चा केली आणि विमान अपघाताबाबतची माहिती घेतली. अपघात नेमका कसा झाला? किती प्रवासी होते यासंदर्भातली विचारपूस केली आणि केंद्राकडून मदतीचं आश्वासनही दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 9:08 pm

Web Title: air india express plane skidded during landing at karipur airport kozhikode kerala scj 81
Next Stories
1 ५९ टक्के भारतीय म्हणतात चीनसोबत युद्ध केलं पाहिजे, ७२ टक्के जनतेला विजयाची खात्री
2 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का?; भारतीय म्हणतात…
3 मोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली? २९ टक्के जनता म्हणते अगदी उत्तम; तर…
Just Now!
X