News Flash

मोठा अपघात टळला: उड्डाण करताच एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला आणि…

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर (आज) मंगळवारी मोठा अपघात टळला

Air India flight hits bird during take off
रायपूरहून एअर इंडियाचे विमान क्रमांक AIC ४६९ दिल्लीसाठी उड्डाण करत होते (photo reuters)

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर (आज) मंगळवारी मोठा अपघात टळला. रायपूरहून एअर इंडियाचे विमान क्रमांक AIC ४६९ दिल्लीसाठी उड्डाण करताच, एक पक्षी विमानाला धडकला. ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यांनतर त्यानंतर लगेच विमान धावपट्टीवर परतले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह देखील या विमानात होते, असे सांगितले जात आहे.

ही घटना धावपट्टी क्रमांक २४ वर सकाळी साडेदहा वाजता घडली. पायलटने हुशारीने विमान लॅंड केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर, अभियंत्यांकडून फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली का हे तपासण्यात आले.

रायपूर विमानतळाचे संचालक राकेश रंजन सहाय यांनी सांगितले की, AIC ४६९ या विमानाने १७९ प्रवाशांसह रायपूर वरुन दिल्लीसाठी सकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर एक पक्षी विमानाला धडकला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धावपट्टीच्या तपासणीदरम्यान पक्ष्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. एअर इंडियाचे अभियांत्रिकी कर्मचारी आणखी विमानाची तपासणी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 2:15 pm

Web Title: air india flight hits bird during take off returns to runway in raipur srk 94
Next Stories
1 “दुसरे जिन्ना होऊन जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करण्याचा असदुद्दीन ओवैसींचा अजेंडा”
2 लहान मुलांमधील करोना संसर्ग वाढला; तज्ज्ञ म्हणतात, काळजीचं कारण नाही पण…
3 पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते? – अमित शाह