22 September 2020

News Flash

केरळ विमान अपघात : मृतांपैकी दोन प्रवासी निघाले करोना पॉझिटिव्ह

बचाव कार्यातील सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना

विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने अपघातग्रस्त झालेलं विमान. (फोटो सौजन्य : एएनआय)

केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघात झाला. दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. या दुर्दैवी दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे धक्क्यात असलेल्या जखमींच्या नातेवाईकांसाठी आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात मरण पावलेल्या १८ प्रवाशांपैकी दोन जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याचं वृत्त इंडिया टिव्हीनं दिलं आहे. दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री ७.४१ वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डय़ात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३० फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २२ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आणखी वाचा- … म्हणून वाचले अनेकांचे प्राण; दीपक साठेंच्या भावाची भावनिक पोस्ट

दरम्यान, या विमान अपघातानंतर चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी दोन जणांना करोनाची लागण झालेली होती. ही माहिती समोर आल्यानंतर विमान अपघातानंतर मदत कार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख, जखमींना दोन लाखांची मदत

अपघाताचा तपास AAIB…

या विमान अपघाताच्या घटनेचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) करणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी तसे आदेश दिले आहेत. पुरी यांनी अपघातस्थळी जाऊन विमानाची पाहणी केली. त्याचबरोबर अपघाताबद्दल अधिकची माहिती घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:40 pm

Web Title: air india plane crash 2 deceased passengers found covid 19 positive bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘पाळीव कुत्र्याच्या बेल्टने आवळला सुशांतचा गळा’
2 … म्हणून वाचले अनेकांचे प्राण; दीपक साठेंच्या भावाची भावनिक पोस्ट
3 “केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय”
Just Now!
X