कोरोना व्हायरसचा एक रुग्ण भारतातील केरळमध्ये आढळला. या रुग्णावर उपचार सुरु आहेत. मात्र आज एक विशेष विमान चीन मधील वुहान या ठिकाणी रवाना झाले. जे काही वेळापूर्वीच वुहान या ठिकाणी पोहचलं आहे. हे विमान शनिवारी पहाटे सर्व भारतीयांना घेऊन परतणार असल्याची माहिती एअर इंडियचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली. या विमानत राम मनोहर लोहिया रुग्णालयातील एक खास पथक आहे. तसंच खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये वाढला आहे. वुहान या ठिकाणाहून भारतात आलेल्या भारतीय विद्यार्थ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर आता तेथील भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाने विशेष विमान पाठवले आहे. दरम्यान भारतात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला आणि तो चीनहून आल्याचे समजताच काही देशांनी चीनहून परतणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असंही समजतं आहे.