19 September 2020

News Flash

चीनमध्ये दरवर्षी प्रदूषणाचे पाच लाख बळी

चीनमध्ये हवा प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर असून दरवर्षी ५ लाख लोकांचा त्यामुळे अकाली मृत्यू होतो ही ज्वलंत समस्या मांडणारी चायना सेंट्रल

| March 3, 2015 12:01 pm

चीनमध्ये हवा प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर असून दरवर्षी ५ लाख लोकांचा त्यामुळे अकाली मृत्यू होतो ही ज्वलंत समस्या मांडणारी चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या सादरकर्त्यां शाय जिंग यांची चित्रफीत ऑनलाईनवर जास्तीत जास्त लोकांकडून बघितली जात असून (व्हायरल होत असून) त्यांच्या या व्हिडिओ म्हणजे चित्रफितीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चीनमध्ये कोळशाच्या वापरामुळे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर आहेत. काहींनी जिंग यांच्या या चित्रफितीतील दाव्यांना आव्हान दिले असून समर्थकांनी या प्रश्नावर नव्याने प्रकाश टाकल्याबद्दल प्रशंसा केली आहे. चीनमधील झाडांची दुरवस्था काळवंडलेले आकाश, मृतवत नद्या यांचा पर्दाफाश या चित्रफितीत केला असून त्याला आकडेवारीची जोड देण्यात आली आहे. त्यात काही अधिकारी, वैज्ञानिक व सामान्य लोकांच्या मुलाखतीही आहेत. बीजिंगमध्ये २०१४ मध्ये १७५ दिवस तर शेजारच्या तियानजीन मध्ये १९७ दिवस प्रदूषण होते, तर शिजियाझुआंग येथे २६४ दिवस प्रदूषण होते असा त्यांचा दावा आहे. त्यात नासाच्या उपग्रहांनी घेतलेली छायाचित्रे दाखवली असून उत्तर चीनमधील नद्यांची दहा वर्षांत झालेली दुर्दुशा चित्रित केली आहे. चीनचे माजी आरोग्यमंत्री शेन झू यांनी असा दावा केला आहे की, चीनमध्ये दरवर्षी पाच लाख लोक प्रदूषणामुळे अकाली मरतात. या चित्रफितीचे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे.
बीजिंगमध्ये कोळशाचा वापर जास्त असून पीएम २.५ म्हणजे २.५ मायक्रॉन व्यासाच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण ६० टक्के आहे. हे कण थेट फुफ्फुसात जाऊन त्याची हानी करतात. चीनमध्ये २०१३ मध्ये ३६ कोटी टन कोळसा जाळण्यात आला तो उर्वरित जगात जाळल्या जाणाऱ्या कोळशापेक्षाही अधिक आहे. पोलाद उत्पादन कारखान्यात त्याचा वापर केला जातो.
कोळसा व तेलाच्या ज्वलनामुळे पीएम २.५ प्रदूशके मोठय़ा प्रमाणावर तयार होतात. अर्थतज्ज्ञ वेन केजियान यांनी सांगितले की, या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले हे चांगले झाले, कांद्याची साल काढावी तसे त्यांनी या समस्येचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:01 pm

Web Title: air pollution kills 7 million people a year in china
Next Stories
1 सईद यांच्या विधानावरून लोकसभेत पुन्हा गदारोळ
2 ‘आप’मध्ये कलह, केजरीवाल गटाकडून योगेंद्र यादव लक्ष्य
3 राज्यसभेत सत्ताधाऱयांवर नामुष्कीची वेळ, आभार प्रस्तावात दुरुस्ती
Just Now!
X