News Flash

राजधानी दिल्लीत प्रदुषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके

दिल्लीत प्रदूषण वाढल्याने करोनाचाही धोका वाढला

राजधानी दिल्लीत प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवत दिल्लीतील काही परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवण्यात आले. वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारा करोनाचा धोका यासोबतच शनिवारी नियम डावलून फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे दिल्लीची हवा जास्तच प्रदुषित झाली आहे.

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी रात्री ४१४ वरुन थेट ४८१ वर पोहचा होता. हे प्रमाण असंच वाढलं तर दिल्लीकरांना धोका निर्माण होऊ शकतो. प्रदूषण आणि करोनाचे वाढते रुग्ण यामुळे दिल्लीत चिंतेचं वातावरण आहे.

हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी दिल्ली आणि आसपासचे प्रदूषण हे अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचले. बऱ्याचश्या भागांमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली असूनही लोक फटाके उडवत होते. दिल्लीतील प्रदूषणात ३२ टक्के वाटा हा पेंढा जाळण्याचा आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याल्याने प्रदुषणाची स्थिती बिकट होते आहे तसंच दिल्लीत प्रदूषण वाढल्याने धुरकं निर्माण झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 9:17 am

Web Title: air quality dips to severe in delhi post diwali scj 81
Next Stories
1 हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन डीसीत एकत्र; राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा केला निषेध
2 रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही, संजय राऊत यांचा मोदींना टोला
3 चिथावणी दिल्यास कठोर प्रत्युत्तर
Just Now!
X