08 December 2019

News Flash

दहशतवादाविरोधात पाक प्रभावी पावलं उचलत नाही, तोवर ‘एअर स्ट्राइक’ होणार : संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात भारताची दहशतवादाबाबतची भुमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाविरोधात खात्रीलायक कारवाया करीत नाही तोपर्यंत भारत आपल्या सुरक्षेसाठी एअर स्ट्राइकसारखी कडक पावले उचलत राहील, अशा शब्दांत केंद्र सरकारने पाकिस्तानाला पुन्हा एकदा बजावले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, पुलवामा हल्ल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की, भारत नेहमीच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच पाकिस्तानी लष्कर जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलिकडील गोळीबाराच्या आ़डून सातत्याने दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास प्रोत्साहित करीत आहे. मात्र, भारतीय सुरक्षा रक्षक याला सडेतोड उत्तर देत आहेत.

त्याचबरोबर या अहवालात म्हटले की, भारत सीमेपलिकडील दहशतादाचा कायमच टार्गेट झाला आहे. त्याला भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करीत गैरलष्करी पण दहशतवादविरोधात कडक एअर स्ट्राइकची कारवाई केली आहे.

तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना कमी झाल्याचेही संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

First Published on July 18, 2019 7:02 pm

Web Title: air strikes will be happened again if pakistan does not take effective action against terrorism says mod aau 85
Just Now!
X