News Flash

‘एअरएशिया’ विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरूच

इंडोनेशियावरून सिंगापूरला जाणाऱ्या ‘एअरएशिया’च्या विमान दुर्घटनेचे गूढ उकलण्यासाठी त्याचा ब्लॅक बॉक्स मिळणे महत्त्वाचे आहे.

| January 2, 2015 04:01 am

इंडोनेशियावरून सिंगापूरला जाणाऱ्या ‘एअरएशिया’च्या विमान दुर्घटनेचे गूढ उकलण्यासाठी त्याचा ब्लॅक बॉक्स मिळणे महत्त्वाचे आहे. हा ब्लॅक बॉक्स सापडण्याची मोहीम सुरू असून त्याला अजून आठवडा तरी लागू शकतो, अशी माहिती इंडोनेशियन वाहतूक सुरक्षा प्रशासनाने दिली.
जावा समुद्रात हे विमान कोसळले असून प्रवाशांचे मृतदेह आणि विमानाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे. खराब हवामानामुळे या मोहिमेत अडचणी येत असल्याने या कामाला काही वेळ लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘‘सध्या समुद्र उधाणलेला असल्याने शोधमोहिमेत अडचणी येत आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतर आणि व्यत्यय थांबल्यानंतरच शोधमोहीम जलदगतीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी आणखी आठवडा लागू शकतो’’ अशी माहिती इंडोनेशिया वाहतूक सुरक्षा प्रशासनाचे सदस्य अँटोनिअस टूस यांनी सांगितले.
या विमानाचा रेकॉर्डर सापडल्यानंतर या विमानाला कुठे जलसमाधी मिळाली याचा शोध लागला. मात्र समुद्रात त्याचे अवशेष नेमके कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध सुरू आहे, असे टूस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:01 am

Web Title: airasia flight qz8501 black box search going on
Next Stories
1 लख्वीच्या जामिनाविरोधात पाक सरकार सर्वोच्च न्यायालयात
2 भारत-बांगलादेश यांच्यात सागरी संशोधनाबाबत करार
3 शारदा घोटाळ्याचा परिणाम नाही- रॉय
Just Now!
X