02 March 2021

News Flash

एअर एशियाचा ‘मेगा सेल’, 999 रुपयांत करा विमान प्रवास

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7 ऑक्टोबरच्या आधी तिकीट बुक करावं लागणार

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विमानसेवा देणारी कंपनी एअर एशियाने ‘मेगा सेल’अंतर्गत एक ऑफर आणली आहे. यामध्ये अवघ्या 999 रुपयांमध्ये विमानाचं तिकीट बुक करता येणार आहे.

एअर एशियाच्या संकेतस्थळानुसार, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7 ऑक्टोबरच्या आधी तिकीट बुक करावं लागणार आहे. बुक केलेल्या तिकीटावर 30 जून 2019 पर्यंत प्रवास करता येईल. केवळ देशांतर्गत प्रवासासाठी ही ऑफर आहे. या ऑफरअंतर्गत बंगळुरू, नवी दिल्ली, अमृतसर, गोवा, कोच्ची, कोलकाता आणि अन्य काही शहरांमध्ये प्रवास करता येणार आहे. मर्यादित कालावधीसाठी असलेल्या या ऑफरनुसार एकदा तिकीट बुक केल्यानंतर त्याचा परतावा मिळणार नाही.

याशिवाय, इंडिगो एअरलाइन्सनेही आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत केवळ 1199 रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. इंडिगोची ही ऑफर 7 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत आहे. तर, 15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत प्रवास करता येणार आहे. मोबिक्विक या अॅपद्वारे तिकीट खरेदी केल्यास कॅशबॅकचा लाभ देखील मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 8:13 pm

Web Title: airasia mega sale offer book flight tickets for as low as rs 999
Next Stories
1 पोलीस ते सौंदर्यवती, २९ वर्षांच्या महिला अधिकाऱ्यानं सौंदर्यस्पर्धेत मारली बाजी
2 Video :…आणि घोडा थेट बारमध्येच शिरला
3 मोदींचा ‘जुडवा’ करणार काँग्रेसचा प्रचार
Just Now!
X