फ्रान्समधील विमान उत्पादक कंपनी एअरबस भारतातील आपल्या कामकाजात येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढ करणार असल्याची घोषणा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर केली.
 मोदी यांनी एअरबसच्या येथील कारखान्याला भेट दिली. त्यावेळी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फेबियस आणि कंपनीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला प्रतिसाद देऊन कंपनी भारतातील आपल्या कामकाजाचा विस्तार करू इच्छिते. एअरबसच्या भारतातील आऊटसोर्सिगचे मूल्य लवकरच २ अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात जाईल, असे एअरबस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम एंडर्स यांनी यावेळी जाहीर केले.