News Flash

एअरसेल-मॅक्सिस प्रकरण : चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा

एअरसेल-मॅक्सिस आर्थिक अफरातफर प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा

(संग्रहित छायाचित्र)

एअरसेल-मॅक्सिस आर्थिक अफरातफर प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामिन पटियाला हाऊस न्यायालयाने 26 नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. तसंच, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांचाही अटकपूर्व जामिन 26 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याच दिवशी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


यापूर्वी, काल (बुधवारी) विशेष न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. चिदंबरम या प्रकरणाच्या तपासात अजिबात सहकार्य करत नसून ते उडवाउडवी करत आहेत. त्यामुळे या टप्प्यावर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करणे तपासासाठी घातक ठरेल असे ईडीकडून कोर्टाला सांगण्यात आले होते.

मागच्या आठवडयात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) पटियाला हाऊस न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले . या प्रकरणात एकूण ९ जणांची नावे आरोपी म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये चिदंबरम यांचे नाव अग्रस्थानी आहे. चिदंबरम यांना जाणूनबुजून या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ईडी सरकारच्या ताब्यात आहे आणि जो कोणी सरकारविरोधात बोलेन त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते हरीश रावत यांनी केला होता. कार्ती चिदंबरमकडून २००६ मध्ये एअरसेल-मॅक्सिस व्यवहारानुसार विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची (एफआयपीबी) मंजुरी मिळाल्या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. त्यावेळी पी चिदंबरम हे अर्थमंत्री होते. ईडीनुसार, एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी कॅबिनेट समितीच्या परवानगीविना मंजुरी दिली होती. ही व्यवहार ३५०० कोटी रुपयांचा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 10:46 am

Web Title: aircel maxis case delhis patiala house court extends the interim protection of p chidambaram till 26 november
Next Stories
1 महात्मा गांधींचा उंच पुतळा भाजपाला का बांधता आला नाही ? : शशी थरुर
2 Rafale deal : सरकार विमानांच्या किंमतीची माहिती सुप्रीम कोर्टालाही देणार नाही?
3 जम्मू-काश्मीर: बडगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X