28 February 2021

News Flash

‘रेड’ चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे निधन

'रेड' चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विटरद्वारे या दु:खद घटनेची माहिती दिली आहे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. पुष्पा यांनी ‘रेड’ चित्रपटात अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून भरघोस कौतुक करण्यात आले होते.

त्यांनी ‘फेवीक्विक’च्या जाहीरातीमध्ये देखील काम केले होते. या जाहिरातीनंतर त्या ‘स्वॅग वाली दादी’ म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पुष्पा त्यांच्या घरात पाय घसरुन पडल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘रेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विटरद्वारे या दु:खद घटनेची माहिती दिली आहे. राज कुमार गुप्ताने पुष्पा जोशी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ‘पुष्पा जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले. माझ्या ‘रेड’ चित्रपटात तुम्हाला भूमिका साकारताना पाहणे माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते.’ त्यानंतर अभिनेत्री काजोलने देखील पुष्पा यांचा व्हिडीओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 1:30 pm

Web Title: ajay devgns raid co star passes away avb 95
Next Stories
1 “… तर साध्वी प्रज्ञा यांना जिवंत जाळू”
2 अमित शाहांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं टाळलं की, विसरले?
3 सीबीएसई बोर्ड परीक्षा- २०२० साठी करण्यात आले मोठे बदल
Just Now!
X