27 September 2020

News Flash

‘एससीओ’च्या परिषदेतून अजित डोभाल यांचा सभात्याग

पाकिस्तानने या कृतीद्वारे यजमान रशियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला.

संग्रहीत छायाचित्र

भारताचा भूप्रदेश हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दर्शविणाऱ्या खोटय़ा नकाशाचा वापर पाकिस्तानने केल्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) परिषदेतून मंगळवारी भारताने सभात्याग केला.

दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे मंगळवारी ‘एससीओ’च्या सुरक्षा सल्लागारांची बैठक सुरू होती. त्यात पाकिस्तानचे मोईद युसूफ यांनी जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे दाखवणारा नकाशा प्रदर्शित केला. या प्रकाराचा निषेध करत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सभात्याग केला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

पाकिस्तानने या कृतीद्वारे यजमान रशियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला. त्यामुळे रशियाशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यानंतर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे बैठकीबाबत दिशाभूल केली, असेही ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:40 am

Web Title: ajit doval resigns from sco conference abn 97
Next Stories
1 बुकर पुरस्काराच्या लघुयादीत अवनी दोशी
2 करोना विषाणू नष्ट करणाऱ्या प्रतिपिंड रेणूचा शोध
3 ‘सीरम’च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच
Just Now!
X