News Flash

शरद पवारांना शकुनी मामा म्हणता, तुमची औकात काय?-अजित पवार

शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार यांचा पूनम महाजन यांच्यावर निशाणा

बारामतीमध्ये पार पडलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना शकुनी मामा म्हणता? तुमची औकात काय? असा प्रश्न अजित पवारांनी आता विचारला आहे. तुमच्या पिताश्रींना तुमच्या चुलत्याने का मारलं? हा प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल का? मग हे महाभारत का काढलं? तुम्ही काहीही बोला आम्ही सहन करू असं होणार नाही असाही इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ही म्हण लक्षात ठेवा. त्यामुळे आपली पातळी ओळखून वागा, असा सल्लाही अजित पवार यांनी पूनम महाजन यांना दिला आहे.

काय आहे प्रकरण?
भाजयुमोच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी मागील आठवड्यात चुनाभट्टी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना शकुनीमामाची उपमा दिली होती. विरोधकांची महाआघाडी म्हणजे म्हणजे महाठगबंधन आहे अशीही टीका पूनम महाजन यांनी केली. त्यांनी ही टीका करताच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रवीणने प्रमोद को क्यू मारा? असा प्रश्न विचारणारे बॅनर मुंबईत लावले होते.

आता पुन्हा एकदा याच टीकेचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम महाजन यांना औकातीत रहाण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही काहीही बोला आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही असंही अजितदादांनी पूनम महाजन यांना सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 1:20 pm

Web Title: ajit pawar comment on poonam mahajan at baramati speech
Next Stories
1 Pulwama Terror Attack: ‘बांधले कफन डोक्याला मी…’
2 गुजरात हाय अलर्टवर! आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा
3 काश्मीरमध्ये सार्वमत का घेतले जात नाही; सरकारला कशाची भीती वाटते : कमल हसन
Just Now!
X