बारामतीमध्ये पार पडलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना शकुनी मामा म्हणता? तुमची औकात काय? असा प्रश्न अजित पवारांनी आता विचारला आहे. तुमच्या पिताश्रींना तुमच्या चुलत्याने का मारलं? हा प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल का? मग हे महाभारत का काढलं? तुम्ही काहीही बोला आम्ही सहन करू असं होणार नाही असाही इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ही म्हण लक्षात ठेवा. त्यामुळे आपली पातळी ओळखून वागा, असा सल्लाही अजित पवार यांनी पूनम महाजन यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण?
भाजयुमोच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी मागील आठवड्यात चुनाभट्टी येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना शकुनीमामाची उपमा दिली होती. विरोधकांची महाआघाडी म्हणजे म्हणजे महाठगबंधन आहे अशीही टीका पूनम महाजन यांनी केली. त्यांनी ही टीका करताच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रवीणने प्रमोद को क्यू मारा? असा प्रश्न विचारणारे बॅनर मुंबईत लावले होते.

आता पुन्हा एकदा याच टीकेचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम महाजन यांना औकातीत रहाण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही काहीही बोला आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही असंही अजितदादांनी पूनम महाजन यांना सुनावले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on poonam mahajan at baramati speech
First published on: 18-02-2019 at 13:20 IST