News Flash

पंजाबमध्ये राजीव गांधींच्या पुतळ्याला काळे फासले

अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे.

पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे.

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना १९८४ मधील शिख विरोधी दंगलीप्रकरणी नुकतीच शिक्षा झाली. त्यानंतर देशातील शिख समाजाकडून काँग्रेस विरोधात रोष प्रकट करण्यात येत आहे. पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे.

अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होइल, असे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर काँग्रेसने राजीव गांधी यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 4:24 pm

Web Title: akali dal youth wing leaders sprayed black paint on a rajiv gandhi statue
Next Stories
1 अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा भाजपा नेत्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
2 देशातील सर्वात मोठया डबल डेकर ब्रिजचे लोकार्पण, जाणून घ्या खास गोष्टी
3 भारतामधील अल्पसंख्याकांबद्दल बोलणाऱ्या इम्रान खान यांना कैफची सणसणीत चपराक, म्हणाला…
Just Now!
X