जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांची रोजनिशी सापडली असून त्यात तो वंशद्वेष्टा होता असे दिसून आले आहे. आइनस्टाइन हा चिनी वंशाच्या लोकांना बौद्धिकदृष्टय़ा कमी दर्जाचे समजत होता. आइनस्टाइनने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, जपान, पॅलेस्टाइन व स्पेनचा दौरा केला होता त्यावेळी त्याने रोजनिशीत केलेल्या उल्लेखानुसार चीनला कळपासारखा देश असे संबोधले आहे. चिनी नागरिक भावनाशून्य यंत्रासारखे वागणारे आहेत असेही आइनस्टाइनने त्यावेळी म्हटले होते. नंतरच्या काळात आइनस्टाइनने वंशवाद हा श्वेतवर्णीय लोकांचा रोग आहे असे सांगून अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीत भाग घेतला होता. आइनस्टाइनच्या रोजनिशीचे जर्मन भाषेतून इंग्रजीत प्रथमच भाषांतर करण्यात आले आहे. यावर आधारित पुस्तक दी ट्रॅव्हल डायरीज ऑफ अल्बर्ट आइनस्टाइन नावाने प्रसिद्ध झाले त्यात म्हटले आहे की, अतिपूर्वेकडून मध्यपूर्वेकडे काही देशांचा प्रवास करताना आइनस्टाइनने त्याच्या रोजनिशीत जे लिहिले आहे त्यावरून तो वंशविद्वेषी होता असेच दिसून येते. चिनी लोक जेवताना किंवा अन्न खाताना नीट बेंचवर बसत नाहीत तर युरोपीय लोकांसारखे जंगलात शौचास गेल्यानंतर बसावे तसे उकिडवे बसतात. त्या लोकांची मुले दिशाहीन, मंद दिसतात.

आइनस्टाइन आता श्रीलंकेत असलेल्या सिलोनला गेला होता तेथे खूप घाण व दरुगधी असल्याचे त्याने त्यावेळी नोंदीत लिहिले आहे. गरजा कमी ठेवा व कमी काम करा हे त्यांचे साधे आर्थिक चक्र असल्याची टीका तो तेथील लोकांवर करतो.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Israel succeeded in preventing an unexpected attack by Iran
इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी; इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
Furious gaur tosses man in the air after he provokes
“आ बैल मुझे मार!” चिडलेल्या रानगव्याने व्यक्तीला तीन वेळा उचलून आपटले, थरारक Video Viral
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

जपानी लोक आइनस्टाइनच्या टीकेतून सुटले आहेत. त्यांच्याविषयी तो म्हणतो की, ते लोक दयाळू, नम्र, साधे, दिमाख न मिरवणारे व भावणारे आहेत. प्रकाशकांच्या मते या पुस्तकात आइनस्टाइनने प्रत्येक देशाच्या लोकांवर केलेल्या टीकेचे उल्लेख आहेत. वेगवेगळ्या वंशाच्या लोकांच्या दृष्टिकोनावर त्याने आक्षेप घेतले आहेत.

पुस्तकाचे संपादक झीव रोसेनक्रांझ यांच्या मते आइनस्टाइनच्या मानवतावादी प्रतिमेस छेद देणारे त्याचे रोजनिशीतील लिखाण आहे. अतिपूर्वेकडील लोक बौद्धिकदृष्टय़ा कमी आहेत. या त्याच्या मतावरून तो वंशद्वेषी होता हे स्पष्ट होते. आधुनिक वाचकाला त्याची ही मते धक्का देणारी वाटतील यात शंका नाही.