News Flash

उत्तर प्रदेशात गावठी दारूचे १२ बळी

जिल्ह्य़ाच्या मलिहाबाद भागातील खारता गावी तसेच उन्नाओ जिल्ह्य़ाच्या तलासराई गावी गावठी दारू पिऊन झालेल्या संसर्गामुळे १२ जण मरण पावले

| January 13, 2015 12:52 pm

जिल्ह्य़ाच्या मलिहाबाद भागातील खारता गावी तसेच उन्नाओ जिल्ह्य़ाच्या तलासराई गावी गावठी दारू पिऊन झालेल्या संसर्गामुळे १२ जण मरण पावले असून अन्य १०० जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. याखेरीज १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
लखनौ येथे आठजण तर अन्य चारजण उन्नाओ येथे मरण पावले. या घटनेची गंभीर दखल घेऊन अबकारी आयुक्त अनिल गर्ग यांनी संबंधित विभागाच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून लखनौचे जिल्हा अबकारी अधिकारी लालबहादूर यादव यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे. गावठी दारू विकणाऱ्या पाचजणांविरोधात खटला दाखल करण्यात आला असून  एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 12:52 pm

Web Title: alcohol kills 12 people in in uttar pradesh
Next Stories
1 एस. के. सिन्हा बांगलादेशचे पहिले हिंदू सरन्यायाधीश
2 मोदींच्या दट्ट्यामुळे गडकरी, सितारामन यांचे परदेशवारीचे मनसुबे धुळीस!
3 ‘त्या’ जहाजावरील दहशतवाद्यांनी विष घेतले असावे- मनोहर पर्रिकर
Just Now!
X