हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे आज शनिवारी जीप दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील कुंडू-त्यूणी रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुब्बलकडे जाणारी जीपच्या वाहकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तीन जनांना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.  अपघाताची सुचना मिळाल्यानंतर पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले आणि तातडीने मदतकार्याला सुरूवात केली. पोलिसांनी तिन जणांना उपचारासाठी तात्काळ स्थानिक रूग्णालयात दाखल केले मात्र, प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल.

जीपमध्ये एकूण १३ जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये सहा पुरूष आणि चार महिलांशिवाय तीन मुलांचाही मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती स्थानिक पोलिस आधिकाऱ्यांनी दिली आहे.