News Flash

कझाकस्तानमध्ये विमान कोसळून २० ठार

अल्मॅटी विमानतळाकडे येत असताना स्कॅट एअरलाइन्सचे एक विमान गडद धुक्यामुळे कोसळून झालेल्या अपघातात २० जण ठार झाल्याचे सदर विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.या विमानात अपघात

| January 30, 2013 12:07 pm

अल्मॅटी विमानतळाकडे येत असताना स्कॅट एअरलाइन्सचे एक विमान गडद धुक्यामुळे कोसळून झालेल्या अपघातात २० जण ठार झाल्याचे सदर विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.या विमानात अपघात झाला, त्यावेळी एकूण २० जण होते. यात १५ प्रवासी, तर पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता, असे विमान कंपनीचा हवाला देताना इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी यात मरण पावले आहेत. कॅनेडियन बनावटीचे सीआरजे-२०० जातीचे हे विमान होते. विमानतळापासून पाच कि.मी. अंतरावर हे विमान कोसळल्याचे स्कॅट एअरलाइन्सने म्हटले आहे. कझाकस्तानच्या गृह तसेच वाहतूक मंत्रालयातील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कझाकस्तानमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेली ही दुसरी विमान दुर्घटना आहे. डिसेंबर महिन्यात लष्कराचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २७ जण मरण पावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:07 pm

Web Title: all 20 on board kazakh airliner killed in crash company
टॅग : Plane Crash
Next Stories
1 पंजाबमध्ये सामूहिक बलात्कार
2 पाकमध्ये गोळीबारात चार ठार
3 शस्त्रास्त्र तस्करी: दोन भावांना अटक
Just Now!
X