28 September 2020

News Flash

‘पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्व खासदार पक्षाबरोबरच’

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.

संग्रहीत छायाचित्र

 

पश्चिम बंगालमधील भाजपचे काही खासदार राज्यातील पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या अफवा असल्याचे सांगून पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सोमवारी त्या फेटाळून लावल्या. पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्व खासदार पक्षासोबतच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

‘भाजपचे काही खासदार तृणमूलमध्ये जाणार असल्याचा संभ्रम पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉँग्रेस सरकारच्या प्रभावाखालील काही पत्रकार पसरवत आहेत. याबाबत्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोडसाळ आहेत’, असे पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रभारी असलेले विजयवर्गीय यांनी इंदूर येथे पत्रकारांना सांगितले.

बंगालमधील भाजपचे सर्व खासदार पक्षासोबतच असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते देशाच्या विकासात सहभागी झाले आहेत, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:04 am

Web Title: all bjp mps in west bengal with the party abn 97
Next Stories
1 ‘चिनी कंपनी प्रायोजक असणाऱ्या आयपीएलवर बहिष्कार घाला’
2 स्पेस एक्सची अवकाशकुपी सुखरूप परत
3 शिवराजसिंह चौहान यांच्या रुग्णालयातील मुक्कामात वाढ
Just Now!
X