05 April 2020

News Flash

राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेणार नाही : महंत नृत्य गोपाल दास

जनतेच्या योगदानातून मंदिराची उभारणी होणार असल्याचंही म्हणाले आहेत.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेतला जाणार नाही, जनतेच्या योगदानातून मंदिराची निर्मिती होणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट) चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे. याचबरोबर सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भव्य राम मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी अयोध्येत बोलवले जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

महंत नृत्य गोपाल दास म्हणाले, आम्ही अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं आहे, आमच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने योगी आदित्यनाथ देखील आहेत. याशिवाय आम्ही धार्मिक कार्यात रस असणाऱ्या इतर राज्याच्या मुख्यमंत्री व राज्यपालांनाही मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी बोलवणार आहोत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देखील बोलवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

महंत नृत्य गोपाल दास यांनी हे देखील सांगिलं की, मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडून कोणतेही अनुदान घेतलं जाणार नाही. जनतेच्या योगदानातून मंदिराची निर्मिती होईल. सरकारसमोर अगोदरच अनेक समस्या आहेत, ज्या मार्गी लावयच्या आहेत. आम्ही त्यांच्यावर अधिक भार टाकू शकत नाही.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिली बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड केली गेली आहे.यावेळी अन्य निवडी देखील करण्यात आल्या, खजिनदारपदी स्वामी गोविंद देवगिरी यांची निवड केली गेली. तर, भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद मिश्रा यांना देण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 9:31 am

Web Title: all cms will be invited for temple construction will take no funds from govt nritya gopal das msr 87
Next Stories
1 वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2 जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3 नागरिकत्व कायद्याची भीती नको!
Just Now!
X