News Flash

१९८७ पूर्वी जन्मलेले सर्व भारतीयच

पालकांची अथवा पालकांनी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची सक्ती नाही, केवळ जन्मदाखला पुरेसा आहे,

नवी दिल्ली : ज्यांचा जन्म भारतात १९८७ पूर्वी झाला आहे अथवा ज्यांचे पालक १९८७ पूर्वी भारतात जन्मले आहेत, ते कायद्यानुसार भारताचे अधिकृत नागरिक आहेत आणि त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्याची अथवा प्रस्तावित देशव्यापी ‘एनआरसी’ची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही, असे सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले आणि नागरिकत्व कायद्यावरून देशात उफाळलेला हिंसाचार शांत करण्याचा प्रयत्न केला.

देशात ‘एनआरसी’ची अंमलबजावणी करताना १९७१ पूर्वीच्या वंशावळीसाठी कोणतेही ओळखपत्र, अथवा पालकांचा जन्मदाखला यासारखी कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. तशी कागदपत्रे केवळ आसाम करार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित ‘आसाम एनआरसी’साठी आवश्यक आहेत, उर्वरित देशासाठी ‘एनआरसी प्रक्रिया’ पूर्णपणे वेगळी असून ती नागरिकत्व (नोंदणी आणि राष्ट्रीय ओळखपत्र) नियम २००३ नुसार आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

जन्मदाखला पुरेसा

पालकांची अथवा पालकांनी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची सक्ती नाही, केवळ जन्मदाखला पुरेसा आहे, मात्र  जन्माबाबत काहीच पुरावा नसेल, तर तुम्हाला पालकांबाबतची माहिती सादर करावी लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सूचना स्वीकारण्यास सरकार तयार

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या सूचना विचारात घेण्याची तयारी केंद्र सरकारने शुक्रवारी दाखवली. सरकार निदर्शकांच्या सूचना स्वीकारण्यास तयार आहे. या कायद्याबद्दलच्या लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जन्मातारखेचा दाखला किंवा जन्मस्थळाचा दाखला सादर करून नागरिकत्व सिद्ध करता येऊ शकते. तथापि, अशा प्रकारच्या कागदपत्रांबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्र, पारपत्र, आधार, चालक परवाना, विमा कागदपत्रे, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन वा घराशी संबंधित कागदपत्रे आणि अशा प्रकारच्या अन्य पुराव्यांचा विचार होऊ शकतो. एकाही भारतीय नागरिकाला त्रास होऊ नये म्हणून पुराव्यांच्या यादीत आणखी कागदपत्रांचा समावेश होऊ शकतो, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:42 am

Web Title: all indians born before 1987 as per national register of citizens act zws 70
Next Stories
1 CAA Protest : सुधारित नागरिकत्व कायदा : हिंसाचाराचे सहा बळी
2 प्रमिला जयपाल यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा नाही
3 CAA Protest : पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा – ममता बॅनर्जी
Just Now!
X