News Flash

स्विस बँकांमध्ये जमा असलेला सर्व पैसा ‘काळा पैसा’ नव्हे: अरूण जेटली

स्विस बँका त्यांच्याकडे जमा असलेल्या सर्व पैशाची माहिती देण्यास तयार नव्हते. या बँकांमध्ये विदेशी पासपोर्ट असणाऱ्या अनेक भारतीयांचे पैसे आहेत.

केंद्रीय मंत्री अरुण जेटली

स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या पैशांत ५० टक्क्यांची वाढ झाल्याचे वृत्त आल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपाला चांगलेच घेरले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरूण जेटली केंद्र सरकारचा बचाव करण्यासाठी उतरले असून स्विस बँकांमध्ये जमा असलेले सर्वच धन काळा पैसा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा पैसा त्या भारतीयांचा आहे, जे विदेशात राहतात. त्या संपूर्ण पैशाला काळा पैसा म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण जेटली यांनी दिले असून विरोधी पक्षाकडून हा मुद्दा विनाकारण वाढवण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जेटलींनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, स्विस बँका त्यांच्याकडे जमा असलेल्या सर्व पैशाची माहिती देण्यास तयार नव्हते. पण जागतिक दबावामुळे हे सर्व शक्य होत आहे. आता त्यांनी माहिती मागणाऱ्या देशांना त्याची हमी दिली आहे. वर्ष २०१९ पासून माहिती मिळण्यास सुरूवात होणार आहे. सीबीडीटीच्या आधीच्या तपासात सांगण्यात आले आहे की, या बँकांमध्ये विदेशी पासपोर्ट असणाऱ्या अनेक भारतीयांचे पैसे आहेत.

जेटलींनी इशारा देत म्हटले आहे की, स्विस बँकांमध्ये बेकायदा पद्धतीने पैसे जमा करणाऱ्या लोकांना शिक्षेचा सामना करावा लागेल. स्वित्झर्लंड सरकारने रिअल टाईम डेटा देण्यास सुरूवात झाल्यानंतर असे होईल, असा विश्वासही त्यांनी दिला.

दरम्यान, याप्रकरणी हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारची बाजू माध्यमांसमोर मांडली. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार १ जानेवारी २०१८ पासून ते आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत संपूर्ण डेटा दिला जाईल. त्यामुळे हा काळा पैसा आहे किंवा बेकायदा व्यवहार आहे असं का म्हणायचं ?’, असे पीयुष गोयल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 12:52 am

Web Title: all money deposited in swiss banks is not black money says arun jaitley
टॅग : Arun Jaitley
Next Stories
1 हस्तमैथून करणाऱ्या रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनसमोर नेऊन चोपलं, पाकिस्तानी तरुणीची फेसबुक पोस्ट व्हायरल
2 लष्करी अधिकारी पत्नी हत्या प्रकरण : मेजर निखील हांडाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
3 पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब पुन्हा व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर थांबणार नाही हसू
Just Now!
X