रुपाणींच्या सहकाऱ्यांना वगळून २४ मंत्र्यांना शपथ

पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुजरातच्या मंत्रिमंडळाचा संपूर्ण चेहराच बदलला. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या २१ जणांसह गुजरात मंत्रिमंडळात गुरुवारी २४ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या एकाही सहकाऱ्याचा समावेश नाही.

या नव्या बदलामुळे भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या २५ वर गेली आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी संपूर्ण परिवर्तन करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे स्पष्ट संकेत भाजपने यातून दिले आहेत.  गुरुवारी दुपारी राजभवनात झालेल्या समारंभात शपथ घेणाऱ्यांमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष  जितू वाघानी यांचा समावेश आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी १० कॅबिनेट मंत्री व १४ राज्यमंत्र्यांना पदाची शपथ दिली. १४ पैकी ५ राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला.  राज्याचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेतलेले भूपेंद्र पटेल आणि गेल्या शनिवारी अचानक राजीनामा देणारे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमात हजर होते.

Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आलेल्यांमध्ये राजेंद्र त्रिवेदी, जितू वाघानी, हृषीकेश पटेल, पूर्णेश मोदी, राघवजी पटेल, कनुभाई देसाई, कीर्तसिंह राणा, नरेश पटेल, प्रदीप परमार व अर्जुन चौहान यांचा समावेश आहे. यापैकी त्रिवेदी, राणा व राघवजी पटेल हे पूर्वी मंत्री राहिलेले आहेत.

काय झाले? रुपाणी मंत्रिमंडळातील नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, कौशिक पटेल, प्रदीपसिंह जडेजा व आर.सी. फालदू यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी अटकळ शपथविधीपूर्वी व्यक्त केली जात होती. त्यानुसार रुपाणी मंत्रिमंडळातील कुणाही सदस्याचा समावेश यात करण्यात आला नाही.