मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप शमलेला नसताना, आता राज्याच्या पर्यटन व संस्कृती मंत्री उषा ठाकूर यांनी मदशांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत. असं उषा ठाकूर यांनी इंदुर येथील एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

”सर्व कट्टरवाद व सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीराल दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समजाच्या मुख्य प्रवाहाशी नाही जोडल्या जाऊ शकत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसमने हे करून देखील दाखवलं आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे. वफ्फ बोर्ड स्वतः अतिशय सक्षम संस्था आहे.

र कुणी खासगीरित्या आपले धार्मिक संस्कार देऊ इच्छित असेल, तर आपली घटना त्याला मूभा देते. असं उषा ठाकूर म्हणाल्या आहेत.
यावेळी त्यांनी सामहिक शिक्षणावर भर देत सांगितले की, विद्यार्थी एक समान असतात, धर्मावर आधारित शिक्षणामुळे कट्टरता वाढत आहे आणि द्वेष भावना पसरत आहे. असं देखील त्या म्हणाल्या.