पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाइल काँग्रेस २०२० ला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन संबोधित केले. उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान भारतात डिजिटल टेक्नोलॉजीवर जो, भर देण्यात येतोय, त्याविषयी बोलले तसेच मोबाइल उत्पादनासाठी भारताला पसंती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारतात अ‍ॅपची बाजारपेठ वेगाने विकसित होत असून मोबाइलचे शुल्कही कमी असल्याचे मोदींनी सांगितले. भारताच्या विकासात टेलिकॉम सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मोदी यावेळी म्हणाले. भारतात टेलिकॉम क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पण अजूनही आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे असे मोदी म्हणाले.

आणखी वाचा- India Mobile Congress 2020 : “करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज”

मोबाइलच्या माध्यमातून शेतकरी, आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि अन्य क्षेत्रातील लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येईल याकडे आता आपल्याला लक्ष दिले पाहिजे असे मोदी म्हणाले.

आणखी वाचा- India Mobile Congress 2020 : 5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– तीन वर्षात सर्व गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल असे मोदींनी सांगितले.
– तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनमुळे सतत मोबाइल हँडसेट आणि उपकरण बदलण्याची आपली संस्कृती बनली आहे. यातून जमा होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची अधिक चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी इंडस्ट्रीने विचार केला पाहिजे.
– भविष्याच्या दृष्टीने लाखो भारतीयांना सक्षम करण्यासाठी 5 G सेवा वेळेवर आणण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे.
– मोबाइल टेक्नोलॉजीमुळेच आपल्याला लाखो भारतीयांपर्यंत वेगवेगळे फायदे पोहोचवणे शक्य झाले आहे. करोना संकटाच्या या काळात मोबाइलमुळेच गरीबांना लगेच मदत करणे शक्य झाले.
– भारताला फोन उत्पादनाची राजधानी बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करुया असे मोदी म्हणाले.