संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात सात पैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. कथुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची नराधमांनी बलात्कारानंतर हत्या केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर या घटनेची भीषणता समोर आली व संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. सर्वसामान्यांसह समाजातील अनेक सेलिब्रिटींनी पुढे येऊन निषेध केला होता.

कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. कथुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी समोर आली होती. निवृत्त सरकारी अधिकारी संजी राम हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. संजी रामनेच बलात्कार आणि हत्येचा कट रचला. संजी रामने त्याच्या पुतण्याला मुलीचे अपहरण करायला सांगितले. पीडित मुलगी नेहमीच जंगलात चारा घेण्यासाठी यायची. १० जानेवारीला पीडित मुलगी चारा शोधत असताना रामच्या अल्पवयीन पुतण्याने तिला गाठले. त्याने पीडित मुलीला गप्पाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचा साथीदार मन्नूनेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ते पीडित मुलीला एका मंदिराच्या आवारात घेऊन गेले. तेथील प्रार्थनाकक्षात पीडितेला डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांना ‘मुलीची हत्येसाठी काही वेळ थांबा. मलाही तिच्यावर अत्याचार करायचे आहे’, असे सांगितल्याची माहिती न्यायलयात सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
wardha, Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Cremation Holikotsav, Remove Superstitions, Associated with Graveyard, terav movie, Harish Ithape,
आज पौर्णिमेस स्मशानभूमीत ‘तेरवं, काय आहे प्रकार जाणून घ्या

सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. जून २०१८ मध्ये या खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात झाली. ही सुनावणी इन कॅमेरा झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. आठ पैकी सात आरोपींविरोधात हत्या, बलात्कार या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी एका आरोपीला सोडून देण्यात आले असून सहा जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.