हरिद्वारहून अलाहबादकडे जात असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेचे तीन डबे आज (शनिवार) रुळावरून घसरले. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजता हरिद्वार एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसचे या अपघातमुळे विस्कळीत झालेली वाहतून सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.