उत्तर प्रदेशात बडय़ा नेत्यांच्या गावात २४ तास वीजपुरवठा होत असून अन्य भागांत मात्र कित्येक तास भारनियमन चालते. हा भेदभाव संपुष्टात आणून राज्याच्या सर्वच प्रांतांत अखंड वीजपुरवठा करावा, ही मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चार आठवडय़ांत बाजू मांडण्यास न्यायालयाने फर्माविले आहे.
न्या. इम्तियाज मुर्तझा आणि न्या. शाही कांत यांनी ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’ आणि अन्य यांनी ही याचिका केली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या आझमगढमध्ये तसेच मैनपुरी आणि कनौज या शहरांत अखंड वीजपुरवठा होत आहे. अन्य भागांत मात्र कित्येक तास वीज नसते, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.