17 January 2021

News Flash

पत्नीने व्याभिचार केला की नाही DNA चाचणीने तपासता येईल; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

कौटुंबिक न्यायायलयाने पतीचा अर्ज फेटाळल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेलं

(प्रातिनिधिक फोटो)

अलाहबाद उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणामध्ये महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करता येईल आणि त्याचा निकाल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल असं न्यायालयाने म्हटलं आहे. हमीरपूर येथील एका जोडप्याचा कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट झाला आहे. मात्र घटस्फोटानंतर तीन वर्षांनी या महिलेने आपल्या माहेरी असतानाच एका मुलाला जन्म दिला. महिलेने हे बाळ पतीचेच असल्याचा दावा केला आहे. मात्र पतीने घटस्फोटानंतर आपण पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले नसल्याचं सांगत मुलं आपलं नसल्याचं म्हटलं आहे.

हे प्रकरण पुढे उच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयाने या महिलेचा घटस्फोटित पतीच बाळाचे वडील आहेत की नाही ते तपासून पाहण्यासाठी डीएनए चाचणीचा मार्ग योग्य असल्याचे म्हटले. या चाचणीमुळे पत्नी व्यभिचारी आहे की नाही म्हणजेच तिचे विवाहबाह्य संबंध आहेत की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये पती राम आरसे याने कौटुंबिक न्यायलयासमोर डीएनए चाचणी करण्यासंदर्भातील अर्ज केला होता. मात्र कौटुंबिक न्यायायलयाने हा अर्ज फेटाळून लावला. अखेर उच्च न्यायालयातील न्या. विवेक अग्रवाल यांच्या एक सदस्यीय खंडपिठाने डीएनए चाचणीसाठी होकार दिल्याचे वृत्त ‘न्यूज १८ हिंदी’ने दिलं आहे.

पतीने दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी २०१३ पासून तो त्याच्या पत्नीसोबत राहत नाही. २५ जून २०१४ ला या दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर आपला पत्नीशी कोणत्याही पद्धतीने संबंध राहिलेला नाही असा दावा पतीने केला आहे. घटस्फोटानंतर ही महिला तिच्या माहेरी राहत होती. घटस्फोटानंतर दीड वर्षांनी २६ जानेवारी २०१६ रोजी या महिलेने एका बाळाला जन्म दिला. मात्र १५ जानेवारी २०१३ नंतर पत्नीसोबत मी एकदाही शरीरसंबंध ठेवलेले नाही असं पतीने न्यायालयाला सांगितलं. तरीही पत्नीने हे मूल पतीचेचे असल्याचा दावा न्यायालयासमोर केला. मात्र पतीने हे मूल आपलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा कौटुंबिक न्यायलयामध्ये गेलं. जिथे न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 4:31 pm

Web Title: allahabad important decision of allahabad high court wife is unfaithful or not dna test can prove scsg 91
Next Stories
1 लडाखमध्ये चीनने भारतीय सैनिकांवर एनर्जी वेपन डागलं? भारतीय सैन्याने सांगितलं सत्य
2 “भाजपा हिंदू-मुस्लीम करु लागल्यावर समजून जावे की देशात निवडणूक आहे”
3 ७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री
Just Now!
X