News Flash

कुंभमेळा २०१९ : मोदी सरकारचा १५ हजार कोटींचा प्लॅन

२०१९ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ही खेळी सुरु असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

२०१९ मध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्याच्या नियोजनात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: लक्ष घातले आहे. आदित्यनाथ दोन दिवसांपासून अलाहाबादमध्ये तळ ठोकून आहेत. येथील परिस्थितीचा ते स्वत: आढावा घेत आहे. कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी येथील संतासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

योगींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभ मेळ्याची तयारी समाधानकारक पद्धतीने सुरु असून सरकार ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करेल. कुंभमेळ्यासाठी १ लाख २२ हजार शौचालये तयार केली जाणार आहेत. कुंभमेळाव्या दरम्यान लोकांना स्वच्छ भारताचा संदेश दिला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे नाव यापूर्वीच प्रयागराज झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अलाहाबाद जिल्ह्याचे नावही प्रयागराज होईल. या कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या ४४३ योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रत्येक कामाचा कालावधीही निश्चित झाला आहे. कुंभमेळाव्यातील कामाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याचे निमंत्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती योगींनी दिली.

२०१९ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ही खेळी सुरु असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे.

2019 कुंभमेळ्यातील शाहीस्नान
14-15 जानेवारी 2019: मकर संक्रांती (पहिलं शाही स्नान)
21 जानेवारी 2019: पौष पोर्णिमा
31 जानेवारी 2019: पौष एकादशी स्नान
04 फेब्रुवारी 2019: मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दूसरं शाही स्नान)
10 फेब्रुवारी 2019: वसंत पंचमी (तिसरं शाही स्नान)
16 फेब्रुवारी 2019: माघी एकादशी
19 फेब्रुवारी 2019: माघी पोर्णिमा
04 मार्च 2019: महाशिवरात्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:48 am

Web Title: allahabad kumbh mela 2019 cm yogi adityanath gives new deadline for rest works
Next Stories
1 बिकानेरमधील भारत-पाक सीमेनजीक राजनाथ सिंह दसऱ्याला शस्त्रपूजन करणार
2 रेल्वे प्रवासी आता ‘झीरो एफआयआर’ दाखल करू शकणार
3 राजीनाम्याच्या मागणीस बगल
Just Now!
X