भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) अलाहाबादमधील युवा नेत्याची बुधवारी रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
हत्या करण्यात आलेल्या भाजप युवा नेत्याचे विमाल पांडे (वय २६) असे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे युवा नेते होते.   
विमाल पांडे यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण अलाहाबादमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त सुत्रांनी दिले आहे. हत्येमुळे संतप्त झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी दवाखान्याची तोडफोड केल्याचेही समजते. त्याचबरोबर शहरातील वाहतूक विस्कळीत करण्याचाही प्रयत्न झाला आहे. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. प्रकरणाची सविस्तर चौकशी  सुरु करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावर तपासणी सुरू आहे.