27 September 2020

News Flash

दाऊदशी संबंधाचे आरोप सिद्ध झाल्यास खडसेंवर कारवाई !

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाई

| May 29, 2016 04:18 am

केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू यांचे स्पष्टीकरण
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाई करण्यापूर्वी त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे सांगितले. खडसेंवर जर आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट
केले.
आम आदमी पक्षाच्या प्रवक्तया प्रीती शर्मा मेनन यांनी गेल्या आठवडय़ात असा आरोप केला आहे की, खडसे यांना दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिने ४ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात अनेकदा दूरध्वनी केले होते.
या सगळ्या प्रकरणात कारवाईच्या शक्यतेबाबत विचारले असता रिजिजू यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यातील माहितीची सत्यासत्यता तपासून पाहावी लागेल.
खडसे यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही असे मुळीच नाही, पण त्याआधी त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्याबाबतच्या माहितीची सत्यासत्यता तपासली पाहिजे. खडसे यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
ज्या क्रमांकावर हे फोन आल्याचा दावा केला आहे तो क्रमांकच वापरात नाही असे खडसे यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी २२ मे रोजी असे स्पष्ट केले होते,की खडसे यांच्या सेलफोन नंबरची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून त्यात दाऊदला फोन केल्याचे किंवा दाऊदने त्यांना फोन केल्याचे दिसून आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:10 am

Web Title: allegations against eknath khadse need to be proved first kiren rijiju
Next Stories
1 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ महिला सक्षमीकरणाचा मार्ग
2 तृणमूलच्या विजयी मेळाव्यात स्फोटामध्ये नऊ जण जखमी
3 पुद्दुच्चेरीत नारायण सामी यांच्या निवडीनंतर गदारोळ
Just Now!
X