News Flash

‘घर घर राशन’ योजनेच्या स्थगितीवरून भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप!

मुख्यमंत्री केजरीवालांच्या आरोपाला भाजपाकडून प्रत्युत्तर; संबित पात्रा यांनी आकडेवारी दर्शवत दिल्ली सरकारवर साधला निशाणा

संग्रहीत

दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरून आता भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावर आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांच्या आरोपांचे खंडण करत, दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राकडून स्थगिती

“केजरीवाल यांनी आज म्हणणं मांडताना सांगितलं की, पंतप्रधान मोदी दिल्लीच्या गरीब जनतेला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवत आहेत आणि ‘घर घर राशन’ ला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर असं अजिबात नाही. पंतप्रधान मोदी नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट आणि पीएम गरीब कल्याण योजनेद्वारे दिल्लीच्या गरजूंना रेशन पोहचवत आहेत.” असं भाजपा प्रवक्त संबित पात्रा म्हणाले आहेत.

तसेच, “मोदी सरकारने दिल्लीला आतापर्यंत नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत ३७ हजार ४०० मेट्रीक टन धान्य पाठवले आणि पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५ जूनपर्यंत ७२ हजार ७८२ मेट्रीक टन धान्य पाठवले आहे. मात्र दिल्ली ५३ हजार मेट्रीक टन धान्यच उचलू शकली आहे आणि यातील केवळ ६८ टक्केच त्यांच्याकडून जनतेला वाटप झाले आहे.” असं देखील संबित पात्रा यांनी सांगितलं आहे.

“देशात पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी होऊ शकते, तर गरिबांच्या घरी रेशनची का नाही?”

तर, पत्रकारपरिषदेत पंतप्रधान मोदींवर थेट टीक करताना “जर या देशात पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी होऊ शकते, स्मार्ट फोन व कपड्यांची होम डिलिव्हरी होऊ शकते. तर मग गरिबांच्या घरी रेशनची होम डिलिव्हरी का नाही होऊ शकत? संपूर्ण देश जाणू इच्छित आहे की तुम्ही ही योजना रद्द का केली?” असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 2:52 pm

Web Title: allegations between bjp and kejriwal government over suspension of ghar ghar ration scheme msr 87
Next Stories
1 आसाम Video: मनोबल वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये PPE किट घालून रुग्णांसोबत डान्स
2 West Bengal: ताडपत्री चोरल्याच्या आरोपाखाली भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
3 “केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, तुम्ही आत्मनिर्भर व्हा!” ट्विटर प्रकरणावरून राहुल गांधींचा निशाणा!
Just Now!
X