गोध्रा येथे २००२ साली झालेल्या साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाचा मुख्य सुत्रधार फारूख भाना याला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून फारुख फरार होता.

गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ साली गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळण्यात आले होते. या जळीतकांडात एकूण ५९ जणांचा ट्रेनमध्ये होरपळून मृत्यू झाला होता. हे जळीतकांड घडल्यानंतर दंगली उसळल्या होत्या. याप्रकरणी तीन आरोपींना अटक देखील झाली होती, तर फारुख भाना फरार होता. अखेर आज त्याला गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील कलोल टोल प्लाझा येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक हिमांशू शुक्ला यांनी दिली. आपल्या कुटुंबियांसोबतच्या एका गुप्त भेटीसाठी तो कलोल टोल प्लाझा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आल्याचे हिमांशू शुक्ला म्हणाले.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

फारुख हा गोध्रा महापालिकेतील माजी नगरसेवक असून गोध्रा रेल्वे स्थानकाच्या फूलन बाजारातील अमन गेस्ट हाऊसमध्ये त्याने बैठक घेतली होती. साबरमती एक्स्प्रेस रात्री दोनऐवजी सकाळी सात वाजता येणार असल्याची माहिती त्यानेच दिली होती. याशिवाय, ट्रेनला आग लावण्यासाठी १४० लिटर पेट्रोलचीही व्यवस्था केली होती, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱयांनी दिली.