देशात गेल्या अडीच महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यादरम्यान, अनेक उद्योगधंदे ठप्प होते. परंतु आता सरकारनं काही प्रमाणात अटी शिथिल करून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान नोकरीशिवाय किंवा कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय भारतीय किती महिने तग धरू शकतात यासंदर्भात एक सर्वेक्षम करण्यात आलं होतं. दरम्यान, अर्धे भारतीय कोणत्याही नोकरीशिवाय किंवा उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तग धरु शकत नाही. तर बऱ्याच कालावधीसाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आणि अर्थव्यवस्थेमुळे तसंच नोकरी गेल्यानं आपण किती काळ तग धरू शकतो, अशी चिता अनेकांना असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

आयएएनएस आणि सीव्होटरच्या ईकॉनॉमी बॅट्री वेब सर्व्हेनुसार २८.२ टक्के पुरूषांनी आपण कोणत्याही नोकरी अथवा उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय एक महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तग धरू शकत असल्याचं म्हटलं आहे. तर २०.७ टक्के पुरूषांनी ते एका महिन्यापर्यंत तग धरू शकत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकजे १०.७ टक्के लोकांनी सांगितलं की ते कोणत्याही उत्पन्नाशिवाय एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी तग धरू शकतात. तक ८.३ टक्के लोकांनी ३ महिने आणि ९.७ टक्के लोकांनी ४ ते ६ महिने आणि ५.७ टक्के लोकांनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तग धरू शकणार असल्याचं म्हटलं आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील डेटा जमा करण्यात आला. तसंच देशभरातील ५०० पेक्षा अधिक ठिकाणच्या लोकांनी यामध्ये आपलं मत नोंदवलं. दरम्यान, यासंदर्भात महिलांनाही विचारणा करण्यात आली. १९.९ टक्के महिलांनी आपण विना नोकरी अथवा उत्पन्न स्त्रोताशिवाय एका महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी तग धरू शकत असल्याचं म्हटलं आहे. तर २८.४ टक्के महिलांनी आपण अशा पद्धतीनं एका महिन्यापर्यंत तग धरू शकू असं म्हटलं आहे.

एकूण ११.५ टक्के महिलांनी आपण एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी तग धरू शकणार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांचा दर हा यापेक्षा उत्तम आहे आणि ते आपल्या बचतीचा वापर करत असल्याचंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांपैकी १९.२ टक्के लोकांनी आपण कोणत्याही उत्पन्नाशिवाय एका वर्षापर्यंत तग धरू शकणार असल्याचं म्हटलं आहे,