27 January 2021

News Flash

‘संस्कारी नव्हे बलात्कारी’ , गंभीर आरोपांनंतर ‘बाबुजीं’विरोधात संताप

आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये नंदा यांनी कुठेही अलोक नाथ यांचं थेट नाव घेतलेलं नाही, मात्र पोस्टच्या अखेरीस त्यांनी तो संस्कारी अभिनेता होता असा उल्लेख केला.

(छायाचित्र- ट्विटर)

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर बॉलीवूडच्या आणखी काही अभिनेत्रीही आपल्या बाबतीतही असेच घडले होते, असे म्हणत आपल्यावरील कथित अत्याचाराबद्दल जाहीरपणे बोलू लागल्या आहेत. त्यांना अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांनी पाठिंबाही दिला आहे. या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरू आहे. यामध्ये नामांकित तितकीच धक्कादायक नावं समोर येत आहेत. असंच एक नाव म्हणजे बॉलिवूडमध्ये संस्कारी बाबुजी अशी ओळख असलेले अलोक नाथ. बलात्काराच्या आरोपांमुळे अलोक नाथ चांगलेच चर्चेत आले आहेत. 1990 मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी मालिकेतील संस्कारी अभिनेत्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

20 वर्षांपूर्वीच्या या घटनेबाबत फेसबुकवर एक भलीमोठी पोस्ट टाकून त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांची ही पोस्ट काही क्षणांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अलोक नाथ ट्रेण्ड व्हायला सुरूवात झाली. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये नंदा यांनी कुठेही अलोक नाथ यांचं थेट नाव घेतलेलं नाही, मात्र पोस्टच्या अखेरीस त्यांनी तो संस्कारी अभिनेता होता असा उल्लेख केला. त्यामुळे नंदा यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडेच होता हे नेटकऱ्यांनी हेरलं आणि आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेक युजर्सनी अलोक नाथ यांच्याबाबत हे वृत्त समजल्यानंतर जबरदस्त धक्का बसल्याचं सांगितलं, तर अलोक नाथ हे संस्कारी नव्हे, बलात्कारी आणि ढोंगी असल्याचं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. काहींनी त्यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे.

(आणखी वाचा : #MeToo : बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबुजीं’वर बलात्कार केल्याचा आरोप)

पाहुयात ट्विटरवरील प्रतिक्रिया –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2018 6:36 am

Web Title: alok nath rape allegations twitter reactions
Next Stories
1 खाकी वर्दीतली माणुसकी: निर्मनुष्य रस्त्यावर तरुणीसाठी थांबवून ठेवली बस
2 …म्हणून सासऱ्याला करावं लागलं २१ वर्षाच्या सुनेसोबत लग्न
3 मुख्यमंत्र्यांच्या बॅनरखाली मंत्र्याची लघुशंका
Just Now!
X