News Flash

शेतकरी गायीसह पोलीस ठाण्यात हजर, कारण…

गेल्या दोन दिवसांपासून गायीला पोलीस स्टेशनच्या समोरच बांधण्यात आलं आहे

रविवारी टोहाना शहरातील पोलीस ठाण्यासमोरच गाय बांधण्यात आली होती (Express photo)

केंद्राच्या तीन शेतकरी कायद्याविरोधात अद्यापही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये दररोज विविध स्तरांवर आंदोलन करण्यात येत आहे. हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील टोहानामधील शेतकरी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या आंदोलनावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर शेकडो निदर्शकांनी शहरातील पोलीस स्टेशनसमोरच तळ ठोकला आहे. त्यांनी तिथेच रात्रभर आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने चक्क आपली गाय पोलीस स्टेशमसमोरच बांधली होती.

नेमकं प्रकरण काय

टोहानाच्या जेजेपीचे आमदार देवेंद्र बबली यांच्या निवासस्थानी १ जून रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. या शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी अन्य गावकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. अटक झालेल्या दोन शेतकर्‍यांच्या सुटकेची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात होती. शनिवारी दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ६० हून अधिक महिलांसह शेतकऱ्यांनी दोन एकर पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन करत रात्र घालवली. शेतकरी नेते गुरनामसिंग चदूनी, राकेश टिकैट आणि स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव हेसुद्धा शनिवारी रात्री आंदोलनकर्त्यांसोबत होते. रविवारी पंजाबचे शेतकरी नेते जोगिंदरसिंग उग्रहान हेदेखील याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनामध्ये शेतकऱ्याने त्या ठिकाणी आणणेली त्याची गाय चर्चेचा विषय बनली आहे. सर्व आंदोलनकर्त्यांबरोबर शनिवारपासून ती गाय सुद्धा तिथेच आहे. घरी तिची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने म्हणून तिला सोबत आणल्याचे तिच्या मालकाचे म्हणणे आहे.

पोलीस स्टेशनसमोरच शेतकऱ्यांचे आंदोलन

रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोनकर्ते आल्याने पोलीस दलाला तिथे बंदोबस्त वाढवावा लागला. काही आंदोलक गुलाबी रंगाच्या कार्पेटवर बसून एकमेकांशी गप्पा मारत होते. कधीकधी तिथल्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांसोबत ते गप्पा मारत होते. जवळपास राहणारे शेतकरी आंदोलनकर्त्यांना खाण्याच्या वस्तू आणि पाणी आणून देत होते.

लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दिल्लीत तीन शेतकऱ्यांना अटक

जेजेपीचे आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर अटक केलेल्या शेतकऱ्यांना माफ केल्याचे देवेंद्र बबली यांनी म्हटले आहे. देवेंद्र बबली यांनी तक्रार मागे घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रविवारी देखील शेतकरी नेते आणि जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्यातीत चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 11:47 am

Web Title: along with the agitating farmers in haryana the cow also appeared at the police station abn 97
Next Stories
1 जामा मशिदीच्या दुरुस्तीसाठी शाही इमामांचं पंतप्रधान मोदींना साकडं
2 मुलगी झाल्यानंतर पत्नीला माहेरुन आणत असताना विहिरीजवळ नेलं अन्…; धक्कादायक घटनेने गाव हादरलं
3 Coronavirus: मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!
Just Now!
X