22 November 2019

News Flash

एक्स गर्लफ्रेंडसोबत भांडण, फेसबुकवर LIVE करुन तरुणाची आत्महत्या

प्रेमाच्या आणाभाका घेताना काही वेळा मुलं भावनेच्या ओघात मी तुझ्यासाठी प्राणही देऊ शकतो हे वाक्य बोलून जातात.

(संग्रहित छायाचित्र)

प्रेमाच्या आणाभाका घेताना काही वेळा मुलं भावनेच्या ओघात मी तुझ्यासाठी प्राणही देऊ शकतो हे वाक्य बोलून जातात. राजस्थानच्या अलवरमध्ये एका २० वर्षीय तरुणाने आपले शब्द खरे करुन दाखवले. एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणावरुन या तरुणाने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. निर्मल कुमावत (२०) असे बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.

आयुष्य संपवताना त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. एक्स गर्लफ्रेंडप्रती आपल्या तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी तसेच तुझ्यासाठी मी मरणही पत्करु शकतो हे सिद्ध करण्यासाठी निर्मलने आत्महत्या केली. सोमवारी रात्री निर्मलने मोबाइलमधून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. त्याने आधी प्रेमात झालेल्या फसवणुकीची माहिती दिली त्यानंतर त्याने गोळया खालल्या व गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकांनी या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहिले असे पोलिसांनी सांगितले. निर्मलने दोन तास आत्महत्येचा लाईव्ह स्ट्रीमिंग केले. प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. निर्मल इतके टोकाचे पाऊल उचलत असताना कोणी त्याला थांबवले नाही. उलट लोकांनी कमेंट बॉक्स दु:ख होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व २० वर्षीय निर्मलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.

First Published on June 18, 2019 2:07 pm

Web Title: alwar man nirmal kumawat live streams suicide on facebook
Just Now!
X