19 September 2020

News Flash

मोदींच्या राफेल करारास काँग्रेसचा पाठिंबा

राफेल विमानांच्या खरेदीमुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार असल्याने हा करार देशाच्या हिताचा असल्याचे सांगत काँग्रेसने या कराराचे समर्थन केले आहे.

| April 12, 2015 01:25 am

राफेल विमानांच्या खरेदीमुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार असल्याने हा करार देशाच्या हिताचा असल्याचे सांगत काँग्रेसने या कराराचे समर्थन केले आहे. तसेच,  ‘स्वत:च्या स्वार्थासाठी स्वामींनी देशहिताच्या आड येऊ नये,’ या शब्दांत सदर करारावर संशय उपस्थित करणारे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांना बोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी फ्रान्स सरकारसोबत केलेल्या राफेल जेट विमान खरेदी कराराचे काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी समर्थन केले आहे. राफेल करार हा देशाच्या सुरक्षेशी संबंधीत मुद्दा आहे. या कराराने भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच हा करार देशाच्या हिताचा असल्याचे कॅप्टन सिंग यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या कराराला विरोध दर्शवत न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. वामी यांना मंत्रिमंडळात जागा हवी आहे. मात्र, मोदींनी त्यांना मंत्रिपद न दिल्यानेच ते हे उद्योग करीत आहेत,’ असे अमरिंदर सिंग म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 1:25 am

Web Title: amarinder asks swamy not to sabotage rafale deal
Next Stories
1 फ्रान्सच्या दौऱ्यात ‘जैतापूर’ला बळ
2 भारत फ्रान्सकडून ३६ ‘रफाल’ विमाने घेणार
3 खासदारांच्या स्वीय सहाय्यकांचे रॅकेट दिल्लीमध्ये सक्रिय
Just Now!
X