27 February 2021

News Flash

प्रियंका गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवा, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मागणी

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी वड्रा यांचे समर्थन केले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी वड्रा यांचे समर्थन केले आहे. पक्षाची सूत्रे हातात घेण्यासाठी प्रियंका गांधी आदर्श उमेदवार आहेत. पक्षाध्यक्षपदी प्रियंका यांची निवड होणार असेल तर त्यांना सर्वांकडून समर्थन मिळेल असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींचे समर्थन केले आहे.

काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी प्रियंका गांधी योग्य व्यक्ती असून त्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे असे थरुर म्हणाले. प्रियंका गांधी यांच्याकडे नैसर्गिक करिष्मा असल्यामुळे अनेकजण त्यांची दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींबरोबर तुलना करतात. प्रियंका गांधीकडे सध्या काँग्रेसचे सरचिटणीसपद असून त्यांच्याकडे पक्षाने उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे.

प्रियंका गांधी वड्रा आदर्श उमेदवार असून काँग्रेसच्या कार्यकारी समितीला निर्णय घ्यायचा आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले. पक्षाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाबद्दलही अमरिंदर सिंग यांनी खेद व्यक्त केला. ते चंदीगड येथे पत्रकारांशी बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 6:34 pm

Web Title: amarinder singh backs priyanka gandhi for congress president dmp 82
Next Stories
1 ‘आम्ही भारतीयच आहोत, मात्र कलम ३५ अ व ३७० हटवता कामा नये’
2 उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला अपघात: भाजपा आमदाराविरोधात FIR
3 Good News : चांद्रयान-२ चंद्रापासून फक्त तीन पावलं दूर
Just Now!
X