12 July 2020

News Flash

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड घेणार ‘लष्कर’च्या दुजानाची जागा

लष्कर-ए-तोयबाने सोपवली जबाबदारी

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल. (संग्रहित छायाचित्र)

लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजाना सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला. आता त्याची जागा अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या बसवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईल घेणार आहे. लष्कर – ए-तोयबाच्या काश्मीरच्या कमांडरची सूत्रे लवकरच अबूकडे सोपवली जाणार आहेत, असे समजते.

मूळचा पाकिस्तानी नागरीक असलेला अबू इस्माईल हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यात सहा महिला भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इस्माईलच्या शोधासाठी सुरक्षा दलानं विशेष मोहीम हाती घेतली होती. दक्षिण काश्मीरमध्ये विशेष सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा महिलांसह सात भाविक ठार झाले होते. लष्कर- ए- तोयबाने हा हल्ला केल्याचं तपासातून समोर आलं होतं. मूळचा पाकिस्तानचा असलेला कमांडर अबू इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या सांकेतिक भाषेतील संभाषणाच्या आधारे अबूचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया यशस्वी ठरल्या असून ‘लष्कर’चे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये कमांडर बाशिर लष्करीचाही समावेश आहे. आता संघटनेचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजानाही सुरक्षा दलाच्या कारवाईत मारला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 10:56 am

Web Title: amarnath yatra attack mastermind abu ismail replace abu dujana lashkars kashmir commander
Next Stories
1 गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
2 ‘ती’ चूक उघडकीला येण्यापूर्वीच पानगढियांना शहाणपण सूचले-चिदंबरम
3 करचुकवेगिरीला चाप! ११ लाखांहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय
Just Now!
X