“करोनाचे संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते,” अशी टीका नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन केली. सेन यांनी केलेल्या मोदी सरकारवर केलेल्या टीकेला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. सेन हे म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असं मी म्हणणार नाही. पण त्यांनी मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी केलेली विधानंही आपण विसरायला नको,” असं उत्तर पश्चिम बंगाल भाजपाच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे.

मुंबईत राष्ट्र सेवा दलाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारच्या कृती कार्यक्रमावर टीका केली होती. “करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. मात्र मोदी सरकार वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. करोनाचे संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते,” असं सेन म्हणाले.

सेन यांनी केलेल्या टीकेवर भाजपाने उत्तर दिलं आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सेन यांच्यावर टीका केली आहे. संपूर्ण जगासमोर सेन मोदी सरकारवर टीका करू शकत नाही. त्यांनी मोदी सरकारवर केलेली टीका पूर्णपणे राजकीय होती,” असं भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे. “सेन म्हातारे झाले आहेत आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे, असं मी अहंकाराने म्हणणार नाही. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी केलेली विधानंही आपण विसरायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारविरुद्ध ते जे काही बोलले आहेत. ते पूर्णपणे राजकीयच आहे,” अशी टीका भट्टाचार्य यांनी केली आहे.

हेही वाचा – “रशियातल्या कुणालातरी हिमाचलमधली लस उत्पादन व्यवस्था दिसते, पण सरकारला नाही”, न्यायालयानं केंद्राला फटकारलं!

सेन भाषणात काय म्हणालेत?

“भारताकडे औषध निर्मितीचे कौशल्य आहे. साथरोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची करोना महासाथीशी लढण्याची क्षमता चांगली होती. पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला सामोरे जाण्याबाबत चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर संकट लादले,” असं सेन आपल्या भाषणात म्हणाले.

हेही वाचा – श्रेयवादातून करोना उपायांकडे दुर्लक्ष -अमर्त्य सेन

अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात १७६९ साली अ‍ॅडम स्मिथ यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला. स्मिथ यांनी या लेखात म्हटलंय की, ‘कुणी चांगले काम करत असेल तर त्याला त्याचे श्रेय मिळते. अनेकदा श्रेय मिळणे हे व्यक्ती किती चांगले काम करतेय याचे संकेत असतात. पण श्रेय उपटण्याचा प्रयत्न करणे ही वैचारिक दिवाळखोरी होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नेमकी हीच चूक केली,’ असा आरोप सेन यांनी यावेळी केला.