News Flash

Amazon स्विगी, झोमॅटोच्या तोंडचा घास पळवणार?; आता थेट घरपोच जेवणही देणार

ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचं कंपनीनं सांगितलं.

गेली काही वर्ष झोमॅटो आणि स्विगी या कंपन्या ग्राहकांना घरपोच जेवण पोहोचवण्याचं काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्या अ‍ॅपच्या माध्यमातून घरपोच जेवण मागवणं सोप असल्यानं या दोन्ही कंपन्यांनी अवघ्या काही कालावधीतच या क्षेत्रात अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली होती. परंतु आता अ‍ॅमेझॉन इंडियानंदेखील ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया ही कंपनी बंगळुरूमधील काही भागांमध्ये घरपोच जेवण पोहोचवण्याची सुविधा सुरू करणार असल्याची माहिती कंपनीकडून गुरूवारी देण्यात आली. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या या निर्णयामुळे आता स्विगी आणि झोमॅटोला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सेवांची चाचणी अ‍ॅमेझॉन इंडियाकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी स्विगी आणि झोमॅटोनं करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. अशाच वेळी अ‍ॅमेझॉन इंडियानं ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

“अ‍ॅमेझॉनवर अन्य वस्तूंच्या सेवेसह खाण्याच्या पदार्थांची घरपोच सेवा दिल्यास आम्हाला आनंद होईल, अशा सुचना अनेक ग्राहक सतत करत होते. सध्याचा कालावधी ही सेवा सुरू करण्यासाठी चांगला आहे कारण ग्राहक घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. स्थानिक व्यापाऱ्याच्याही काही गरजा आहेत आणि स्थानिक व्यापाराला मदत मिळावी ही बाब आम्ही समजू शकतो,” असं मत अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार

विस्ताराची माहिती नाही

भारतीय बाजारात सध्या कंपनीच्या या सेवेचा विस्तार केला जाईल किंवा नाही याबाबत कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. सध्या बंगळुरूतील काही ठराविक भागांमध्ये ही सेवा दिली जाणार असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. याद्वारे ग्राहकांना निवडक स्थानिक हॉटेल आणि क्लाऊड किचनमधून जेवण मागवता येणार आहे. ग्राहकांना उत्तम पदार्थ मिळावेत तसंच त्यांच्या अपेक्षांप्रमाणेच त्यांना सेवा पुरवावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

सध्या १०० रेस्तराँद्वारे सेवा

सध्या बंगळुरूमध्ये काही ठराविक भागांमध्ये १०० रेस्तराँद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. यामध्ये बॉक्स ८, चाय पॉईंट, फासोस, मॅड ओव्हर डोनट्ससोबतच रॅडिसन आणि मॅरिअटसारखी होटेल्सही सामिल असतील, असं कंपनीनं सांगितलं. कोणत्याही ग्राहकांना अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपद्वारे या सेवेचा लाभ घेता येणार आहे. परंतु ज्या ठिकाणी ही सेवा सुरू आहे त्याच ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅपमध्ये ते ऑप्शन दिसणार आहे. सद्या ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रात झोमेटो आणि स्विगीचा दबदबा आहे. परंतु अ‍ॅमेझॉनची या क्षेत्रात एन्ट्री त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:22 pm

Web Title: amazon enters food delivery business takes on zomato swiggy as coronavirus eats up ecommerce biz lockdown jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 थरारक ! गर्भवती महिलेला नेत असतानाच सिंहांनी अडवला रस्ता, त्यानंतर घडलं असं काही….
2 करोना, चक्रीवादळानंतर आता टोळधाडींचे संकट; मध्य प्रदेशमधील १५ जिल्ह्यांमधील शेतकरी हैराण
3 संकटकाळातही ‘ही’ कंपनी देणार दीड लाख कर्मचाऱ्यांना बोनस; कर्मचाऱ्यांचीही भरती होणार
Just Now!
X